संस्मरणे

दुर्लभं त्रयमेवैत देवनुग्रहेनुकम। मनुष्यत्वम् मुमुक्षत्व महापुरुष संश्रयः ।।

मनुष्यजन्म सार्थकी  लावायची इच्छा आणि महान पुरुषांचा आशिर्वाद, ह्या दुर्लभ गोष्टी आहेत. आणि त्या ईशकृपेनेच प्राप्त होतात. माझी योग्यता आहे किंवा नाही, हे माहित नाही पण जेवढी आहे, त्या प्रमाणांत, मनुष्यजन्मानंतर तो जन्म सार्थकी लावण्याची इच्छाशक्ती व देवकृपा, वशात् माझे वडील, चित्रे गुरुजी आणि इतरही काही सज्जनांची कृपा, प्राप्त होत गेली आणि हा जीवन प्रवास आजतागायत असा सुरु आहे. “समाधान चिंतामणी ज्याचे दुरीचा पाषाण” – या संत वचनानुसार इतर काही मिळवता आले किंवा नाही याची खंत नाही माञ, समाधान भरपूर मिळाले हे खरे!
अशाच या समाधानपूर्ण आयुष्यातील अगदी आठवण आहे तेव्हापासून ते आतापर्यंत काही संस्मरणें लिहून शब्दबद्ध  करावी असे वाटत होते आणि येथे अमेरिकेत, तेवढी फुरसत देखील मिळत आहे, तेव्हा हा प्रयत्न करीत आहे.

मनुष्यजन्म, तो जन्म सार्थकी लावायची इच्छा आणि महान पुरुषांचा आशिर्वाद, ह्या दुर्लभ गोष्टी आहेत. आणि त्या ईशकृपेनेच प्राप्त होतात. माझी योग्यता आहे किंवा नाही, हे माहित नाही पण जेवढी आहे, त्या प्रमाणांत, हा जन्म सार्थकी लावण्यासाठी हवी असलेली इच्छाशक्ती व देवकृपा, माझे वडील, चित्रे गुरुजी आणि इतरही काही सज्जनांची कृपा मला मिळाली. आणि जीवन प्रवास आजतागायत असा सुरु आहे. “समाधान चिंतामणी ज्याचे दुरीचा पाषाण” – या संत वचनानुसार इतर काही मिळवता आले किंवा नाही याची खंत नाही माञ, समाधान भरपूर मिळाले हे खरे! 

अशाच या समाधानपूर्ण आयुष्यातील, अगदी आठवण आहे तेव्हापासून ते आतापर्यंत काही संस्मरणें लिहून शब्दबद्ध  करावी असे वाटत होते आणि येथे अमेरिकेत, तेवढी फुरसत देखील मिळत आहे, तेव्हा हा प्रयत्न करीत आहे. 

बोर्डी, आमचा बालपणीचा काळ जेथे व्यतीत झाला, ती बोर्डी आज पण आहे, तरी ‘होती’ असे का म्हणतोय? तर सुमारे ६-७ दशकांपूर्वी असलेली ‘ती’ बोर्डी आज नाही. आज ‘ती’ बोर्डी का नाही, तर त्या वेळची आम्हाला वडीलधारी असणारी बहुतेक माणसे आता कालौघात निघून गेली. विकासाच्या नावाखाली शहरांचे जे ‘भकासीकरण’ सुरु आहे त्याची झळ बोर्डीला देखील लागली. त्यावेळचे ‘हिरवे सौंदर्य’, जमिनीचे ’एन. ए.करण’ (NA -non agricultural plots- शेत जमिनींचा वापर व्यापार व उद्योगासाठी) सुरु झाल्याने नष्ट होत आहे. छान टुमदार झोपड्या वा ‘घरा’ ऐवजी, मजलेवाल्या व ब्लॉक सिस्टिम सुरु करणाऱ्या इमारती तयार होत आहेत. शेतामध्ये ‘रिसॉर्ट’ बनत आहेत. समुद्राची गाज ऐकत सुंदर किनाऱ्याचे अनुपम सौंदर्य मिरवणारी बोर्डी, त्या किनाऱ्याचा ऱ्हास व प्लास्टिकच्या घाणीचे दारिद्र्य सोबतीला घेऊन आहे. बैलगाडी हेच दळणवळणीचे मुख्य साधन नष्ट होऊन, २४ तास मोटारी व ट्रकच्या आवाजाने व सतत घोंघावणाऱ्या पर्यटकांच्या झुंडीने आजारी होत आहे. झाडा-झुडपांतील पायवाटा महामार्गासाठी वापरली जात आहेत. सुंदर कमळांनी अलंकृत केलेले तलाव, गटाराच्या पाण्याने प्रदूषित झाल्याने ऱ्हास पाऊ लागले आहेत. अंधाऱ्या रात्रीत चंद्र-प्रकाशांत निवांत झोपणारी बोर्डी, आज विजेच्या झगमगाटाने गलबलून गेली आहे. — म्हणूनच म्हणतो, ‘एक होती बोर्डी’! 

तसे म्हटले तर आजकाल जे होत आहे त्यालाच ‘प्रगती’ म्हणतात आणि या विकासाच्या गर्दीत निसर्गाची साथ हरवते आहे व ‘माणूसपण’ दुर्लभ होत आहे. व हे असेच सुरु राहिले तर तो काळ दूर नाही, जेव्हा आमची भावी पिढी म्हणेल “एक होती बोर्डी”.

बोर्डीला मी १९४८ साली पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतला, तेव्हा आलो. त्या आधीची सहा वर्षे ही उमरोळी ह्या बोईसर- पालघर च्या मध्ये असलेल्या गावात हुंदडण्यात गेली. खरा ‘बालपणीचा काळ मजेचा हा उमरोळीत गेला. तेव्हा तेथील काही रम्य आठवणी आहेतच. उमरोळी सोडल्यानंतर, म्हणजे आप्पांची  बदली बोर्डी शाळेंत झाल्यानंतर, आम्ही चौघे (अण्णा -लहान भाऊ व मी तसेच आई आप्पा) अगदी वर्षभराच्या अरुणास(लहान बहीण ) घेऊन शाळेत दाखल होण्यासाठी बोर्डीस आलो.

बोर्डी, आमचा बालपणीचा काळ जेथे व्यतीत झाला, ती बोर्डी आज पण आहे, तरी ‘होती’ असे का म्हणतोय? तर सुमारे ६-७ दशकांपूर्वी असलेली ‘ती’ बोर्डी आज नाही. आज ‘ती’ बोर्डी का नाही, तर त्या वेळची आम्हाला वडीलधारी असणारी बहुतेक माणसे आता कालौघात निघून गेली. विकासाच्या नावाखाली शहरांचे जे ‘भकासीकरण’ सुरु आहे त्याची झळ बोर्डीला देखील लागली. त्यावेळचे ‘हिरवे सौंदर्य’ जमिनीचे ’एन. ए.करण’ (NA -non agricultural plots) सुरु झाल्याने नष्ट होत आहे. छान टुमदार झोपड्या वा ‘घरा’ ऐवजी मजलेवाल्या व ब्लॉक सिस्टिम सुरु करणाऱ्या इमारती तयार होत आहेत. शेतामध्ये ‘रिसॉर्ट’ बनत आहेत. समुद्राची गाज ऐकत सुंदर किनाऱ्याचे अनुपम सौंदर्य मिरवणारी बोर्डी, त्या किनाऱ्याचा ऱ्हास व प्लास्टिकच्या घाणीचे दारिद्र्य सोबतीला घेऊन आहे. बैलगाडी हेच दळणवळणीचे मुख्य साधन नष्ट होऊन, २४ तास मोटारी व ट्रकच्या आवाजाने व सतत घोंघावणाऱ्या पर्यटकांच्या झुंडीने आजारी होत आहे. झाडा-झुडपांतील पायवाट, महामार्गासाठी वापरली जात आहेत. सुंदर कमळांनी अलंकृत केलेली तलावे , गटाराच्या पाण्याने प्रदूषित झाल्याने ऱ्हास पाऊ लागली आहेत. अंधाऱ्या रात्रीत चंद्र-प्रकाशांत निवांत झोपणारी बोर्डी आज विजेच्या झगमगाटाने गलबलून गेली आहे. — म्हणून म्हणतो, ‘एक होती बोर्डी’!

तसे म्हटले तर आजकाल जे होत आहे त्यालाच ‘प्रगती’ म्हणतात आणि या विकासाच्या गर्दीत निसर्गाची साथ हरवते आहे व ‘माणूसपण’ दुर्लभ होत आहे. व हे असेच सुरु राहिले तर तो काळ दूर नाही, जेव्हा आमची भावी पिढी म्हणेल “एक होती बोर्डी”.