आप्पांची पत्रे भाग-3

आप्पांच्या पत्रसंग्रहातील पुढील काही पत्रे आम्ही प्रकाशित करीत आहोत ही पत्रे 1965 सालातील असून त्यावेळी मी आणि अण्णा आमचे महाविद्यालयीन शिक्षण कैलास वासी अण्णासाहेब वर्तक स्मारक मंदिर दादर येथील कैलासवासी तात्यासाहेब चुरी विद्यार्थी वसतिगृहात राहून करत होतो. हा कालखंड आमच्या आयुष्यातील अतिशय खडतर होता कारण आम्हा दोघांचे महाविद्यालयीन शिक्षण वसतिगृहात राहून पूर्ण करणे व त्यासाठी तेथील राहण्याची व जेवणाची सोय बाहेर खानावळीत करून घेणे,आर्थिकदृष्ट्या कठीण काम होते. जेवण वस्तीगृहात मिळत नव्हते ते बाहेरच घ्यावे लागे. त्यामुळे आप्पांना आमच्या भोजन व्यवस्थेबद्दल असलेली चिंता यांनी येथे व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे मला “युडीसिटी” या प्रसिद्धं संस्थेत प्रवेश मिळाल्याने, पदव्युत्तर अभ्यासक्रम बीएस्सी टेक चालू होते आणि कर्मधर्मसंयोगाने कैलासवासी तात्यासाहेब वसतिगृहाचे रेक्टर शिप मला मिळाली होती. या वसतिगृहाचे प्रथम रेक्टर श्रीयुत मधुकर ठाकूर भारत सोडून इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी जाणार होते व त्यामुळे संघाच्या विश्वस्तांनी ही संधी मला दिली होती. आप्पांनी त्याबाबतीत देखील मला काही सूचना करून ,हे काम तुला कशा रीतीने करावे लागेल याची कल्पना मला दिली होती. यु डी सि टी मधील अभ्यासक्रम,वसतिगृहाचे काम, त्याचप्रमाणे अण्णासाहेब वर्तक हॉलचे काम इत्यादी करताना माझी धावपळ होणार म्हणून आप्पांना असलेली चिंता व त्यांनी केलेले मार्गदर्शन या पत्रात आहे. अण्णाचे बाबतीत देखील त्यांना काही सूचना करावयाच्या होत्या ,त्या त्यांनी केल्या आहेत त्याचबरोबर अण्णाला मिळालेल्या, मेरिट स्कॉलरशिप चा त्यांना खूप आनंद झाला होता, तेही उल्लेखनीय आहे.पपी, नीलम त्यावेळेला चिंचणीत होते व त्यानी ,आम्हा दोघांना पाठवलेले पत्र देखील या सोबत आहे .अरुणा यावेळी विरारला मावशीकडे राहत असून वसईला ती पुढील शिक्षण घेत होती त्याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे अशा रीतीने सर्व मुलांचे शिक्षण एकावेळी चालू असून विशेषतः आम्हा दोघांना होणारा आर्थिक बोजा सांभाळण्याची मोठी कसरत आप्पांना त्यावेळी करावी लागली. देवावर भरोसा ठेवून ही तुमची जीवन नौका सागरात सोडली आहे ,पैशाच्या बाबतीत तुम्ही काही काळजी करू नका परमेश्वरावर माझा भरोसा आहे अशाप्रकारचे आश्वासन त्यांनी आम्हाला इथे दिले आहे….
जरूर वाचा..

Letter by Pradip Raut