कॅटेगरी: people

मोठी आई गेली. भाग ८

मोठी आई अखेरच्या दिवसात तिच्या आईची, आक्काची सतत आठवण करीत होती. ‘माजी का’, ‘माझी आका’ असे काहीतरी बोलत राही. “माझ्या आक्काचे नाव चिमणी बाई होते तुम्हाला माहित नाही का?” असे आम्हाला विचारी.

उर्वरित वाचा

आमची मोठी आई भाग ५

मला शाळेत जाण्यात आवड नव्हती. अभ्यास करावा वाटत नसे. खेळणे बागडणे व लहान भावंडांचे संगोपन करणे हेच मला जास्त प्रिय होते. त्याच सुमारास तुमचे आप्पा(तुमचे वडील) आमच्या शाळेत शिक्षक म्हणून आले. माझा आप्पांशी पहिला संबंध  गुरूजी  म्हणून आला.

उर्वरित वाचा

आमची मोठी आई भाग 4 

लहानपणी काही समजत नव्हते. मात्र आज  गत जीवनाचा विचार मनात येतो तेव्हा वाटते, नियतीने आमच्या पाटील कुटुंबीयावर एवढा अन्याय का केला? कळत नाही!

उर्वरित वाचा

आमची मोठी आई भाग ३

जुन्या आठवणी निघाल्यास ज्यांनी कोणी उपकार केले अशा लोकांचा कृतार्थतेने उल्लेख होतो. ज्यांनी अन्याय करून दुःख दिले त्यांच्या आठवणी निघाल्यास आजही “एके फोर्टी सेवन” च्या फैरी सुरू होतात…त्यांचा व त्यांच्या सातकुळांचा उद्धार होतो

उर्वरित वाचा

मी मोठी आई बोलते भाग २

बोर्डीच्या घरात रहात असताना त्या मातीने लिंपलेल्या कारवीच्या घरात, विशेषतः पावसाळ्यात किती अडचणी येत असत त्या काय सांगाव्यात? कुडाच्या भिंतीना भोके पडलेली असत. त्यातून लहान सरपटणारी जनावरे हळूच शिरून घरातील कोपऱ्यात लपून राहत.

उर्वरित वाचा

मी मोठी आई बोलतेय.. भाग एक.

   आमची आई म्हणजे सर्वांची ‘मोठी-आई’, आज ‘१०४ नाबाद’, आहे! नोव्हेंबर २०२१ मध्ये तिने आयुष्याची शंभर वर्षे पूर्ण करून १०१ व्या वर्षात पदार्पण केले. आमच्या घोलवडच्या घरी तिची मुले नातवंडे पतवंडे

उर्वरित वाचा

शांताराम ठाकूर, एक सच्चे सकारात्मक व्यक्तिमत्व!

कोणत्याही  यशस्वी माणसाचा जीवनपट पाहिल्यावर उमेदवारीच्या त्या काळात त्यांनी केलेले खडतर परिश्रम, झेललेली संकटे आणि त्यातून वाट काढत शेवटी प्राप्त केलेले यश असाच क्रम दिसून येतो.

    दातिवरे सारख्या आडवळणी, दळणवळणाच्या काहीही सोयी नसलेल्या पिण्याच्या पाण्याची ही उपलब्धता नसलेल्या गावात जन्मलेल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने व्ह. फायनल ची परीक्षा उत्तम प्रकारे पास झाल्यावर पुढे माध्यमिक शिक्षणासाठी  रोज पाच किलोमीटर कच्च्या रस्त्यावरून पायपीट करीत, शिक्षण चालू ठेवले, शालान्त परीक्षा उत्तीर्ण केली, पुढील उच्च शिक्षणासाठी आवड व  गुणवत्ता असतानाही मुंबईत जाणे शक्य नव्हते म्हणून वसईच्याच टीचर्स ट्रेनिंग कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण करून मुंबई महापालिकेतून शिक्षकी पेशाचा श्री गणेशा केला, आपल्या गावाला न विसरता, भावी आयुष्यात गावात पिण्याचे पाणी, माध्यमिक शिक्षणाची सोय, असे गावासाठी जे  करता येईल ते करण्याचा चंग बांधून आपले गाव व परिसर एका नवीन उंचीवर नेऊन ठेवला …

उर्वरित वाचा

लोकनेते अण्णासाहेब वर्तक व महानायक पद्मश्री भाऊसाहेब वर्तक – लोकोत्तर पितापुत्र

ज्या महानुभावांनी आमच्या संघाची 104 वर्षांपूर्वी स्थापना केली व समाज उपयोगी संस्था उभारल्या,त्यामुळेच आज आपण जे काही आहोत ते झालेलो आहोत. या संस्था उभ्या राहिल्या नसत्या तर ही प्रगती  झाली नसती. आपण कितीही हुशार असलो कर्तुत्ववान असलो तरी ज्या नेत्यांनी व शैक्षणिक संस्था मुळे आपण शिकलो त्याची जाणीव ठेवून व्यक्तिगत व सामाजिक जीवनात त्यांचे योगदान आपण मानले पाहिजे असे मला तीव्रतेने वाटते. त्या दृष्टीनेच आमच्या अण्णासाहेब वर्तक व भाऊसाहेब वर्तक अशा लोकत्तर नेत्यांची चरित्रे आपण लक्षात घेतली पाहिजेत.

उर्वरित वाचा