बोर्डीचा सिंह कै. महादेव लक्ष्मण राऊत (माधवमामा)
इंग्रजांचे वर्चस्व असताना, लोकमान्यांच्या हाकेला ओ देऊन, भारत भूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वाहणा-या व त्यासाठी तन, मन, धन समर्पित करणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांमध्ये आमच्या बोर्डीचे सिंह कै. महादेव लक्ष्मण राऊत उर्फ सर्वांचे माधवमामा हे एक असेच धडाडीचे नेतृत्व होते. ते म्हणत “ज्या अर्थी मला राष्ट्रसेवा करावयाची आहे तर ब्रिटिशसत्ते विरुद्ध संघर्ष अटळ आहे. या सत्तेविरुद्ध संघर्ष म्हणजे परिणामांच्या सिद्धतेलाही तयारी असली पाहिजे आणि माझी तयारी झाली आहे!”
उर्वरित वाचा