महिना: एफ वाय

एक ऊमदा समाजसेवक, कै. सतीश नाना वर्तक!

        देखणे रूप, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि याच्याच जोडीला भावस्पर्शी बोलणे असा दुर्मिळ त्रिवेणी संगम असलेले, सामाजिक, राजकीय व कलाक्रिडा क्षेत्रातील एक कार्यकर्ता म्हणून सतीश नाना वर्तक एक देवदुर्लभ असे गृहस्थ होते. आमच्या सो. क्ष. समाजातच नव्हे तर ज्या ज्या विविध क्षेत्रात त्यांनी काम केले त्या सर्वांनाच ते हवेहवेसे वाटत होते.   

उर्वरित वाचा

 “अंतरी निर्मळ”, कै. मनोहर लोटलीकर!

एम डी लोटलीकर’ हे नाव त्याकाळी सबंध हिंदुस्थानातच नव्हे तर परदेशातही ल्यूब-क्षेत्रातील एक खणखणीत वाजणारे नाणे होते. श्री मनोहर डी लोटलीकर म्हणजे एक अफलातून व्यक्तिमत्व. कुशाग्र  बुद्धिमत्ता व परोपकारी सहृदयता याचे मनोहरी मिश्रण! त्यांच्या वेळी मॅट्रिक परीक्षेत गुणवत्ता यादीत आले होते. ही गुणवत्ता त्यांनी आपल्या बी इ इंजीनियरिंग पदवी या पदवी परीक्षेपर्यंत कायम टिकविणे त्यांची ही हुशारी पाहूनच त्यावेळची प्रख्यात अमेरिकन कंपनी स्टॅंनव्हॅकने  अमेरिकेतूनच त्यांना आपल्या भारतातील आस्थापनासाठी निवड केली.

उर्वरित वाचा

पद्मश्री कै.भाऊसाहेब वर्तक, एक तेजोमय पर्व!   

केवळ सो. क्ष. समाजच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक राजकीय शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेमध्ये, आणि त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयुष्यभर कार्यरत असलेले एक तेजस्वी विलक्षण व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय भाऊसाहेब वर्तक होतं. विरार ग्रामपंचायतच्या सरपंचाची जबाबदारी घेतल्यापासून ते पुढे सुमारे तीन दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात राहिलेल्या भाऊसाहेबांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत अनेक पदे समर्थपणे भूषविताना राज्य सरकारमध्येही कर्तुत्वाने राजकारणावरही आपला ठसा उमटविला.

उर्वरित वाचा

“ज्योतीने तेजाची आरती”, कै.भास्करराव व कै.भालचंद्र पाटील.

  आयुष्य मोठं असो अथवा लहान, मानवी जीवन ही एक संधी मानून  या संधीच तुम्ही सोन करा. तुमच्या अल्प आयुष्याचेही सोने होईल.  समुद्र हा सर्वांसाठी सारखाच. काहीजण त्यातून मोती काढतात, काहीजण

उर्वरित वाचा