आप्पांची पत्रे भाग-५
आप्पांच्या पत्राचा पाचवा भाग आज प्रसिद्ध करीत आहोत ही पत्रे 1965 च्या अखेरी ची आहेत मी व अण्णा आम्ही तात्यासाहेब चुरी वसतिगृह ,दादर येथेच राहत होतो . त्यामुळे एकाच कार्डावर दोघांनाही स्वतंत्रपणे ही पत्रे आप्पांनी लिहिलेली आहेत. त्याच सुमारास, भारत- पाकिस्तान युद्धाचे ढग जमू लागले होते. पाकिस्तानी सॅबरे जेट विमान , मुंबईपर्यंत आल्याने सर्वांनाच काळजी वाटत होती. तसे उल्लेख या पत्रामध्ये दिसतात . वसंत भाऊ यावेळी डहाणूत बँकेमध्ये हे कामाला लागला होता व त्याचे ही एक दुर्मिळ पत्र यात आहे .त्यातही त्याने “आम्हाला तुमची काळजी वाटते .. रजा घेऊन काही दिवस येथेच रहावयास या …”असा आपलेपणाने उल्लेख केलेला आहे. अरुणा यावेळेस गोंडू मावशीकडे थोडे दिवसासाठी रहावयास आली होती ,त्यामुळे तिचा मुक्काम विरारला होता. मोठी अाईने, त्या सुमारास विरार-वसई कांदिवली असा दौरा केल्याचा उल्लेख आहे. त्या सुमारास, अरुणाच्या च्या लग्नाची बोलणी चालू होती. मुलगी बघणे वगैरे कार्यक्रम झाला होता व पुढच्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी 1966 मध्ये लग्न करावे अशी, वरा कडील मंडळीची इच्छा असल्याचेही लिहिले आहे .याबाबतीत ,काही चर्चा,मसलत, आप्तस्वकीया बरोबर करण्यासाठी, मोठी आई बहुदा हा दौरा करीत असावी.
श्रीयुत भाईंचा ही यात उल्लेख असून,” सावे मुलगी पाहून गेले “असे आप्पानी लिहिले आहे .खूपच जुना व गमतीशीर असा इतिहास या निमित्ताने आपल्याला वाचावयास मिळेल, तरी ,ही पत्रे जरूर वाचा एक गंमत म्हणून!!