महिना: एफ वाय

सामाजिक योगदानात, माझा खारीचा वाटा!

“दुर्लभं मानवे जन्मः..” असे म्हटले जाते. या मानवी जन्मात अनेक प्रकारच्या ऋणांची फेड करावयाची असते. त्यातील एक म्हणजे समाजॠण! ज्या समाजाने आपल्याला सामावून घेतले, मदत व मार्गदर्शन केले, ते ऋण अंशतः तरी फेडणे हे आपले कर्तव्य असते. तसे करताना मी काहीतरी विशेष केले अशी भावना नसावी. आमच्या सो क्ष समाजोन्नती संघाच्या स्थापनेला 100 वर्षे होऊन गेली आहेत. संघ स्थापनेपपासून ते आजच्या या ऊर्जेतावस्थेपर्यंत ज्या समाज बांधवांनी व धुळे नांदणी मोठे योगदान दिले, त्यांच्या कार्याचा आठव करतांना मी स्वतःला,विचारतो,   “मी समाजाला काय दिले? सर्वांकडून काही ना काही घेतच आलो पण अगदी निरपेक्षपणे मी काय दिले”.

उर्वरित वाचा

सोमवंशी क्षत्रिय वाडवळ पाचकळशी समाजाची मागील शंभर वर्षांतील वाटचाल

सोमवंशी क्षत्रिय वाडवळ पाचकळशी हा प्रामुख्याने पालघर जिल्ह्यात वसलेला समाज आहे. शके १०६२ म्हणजे इ. स. ११४० च्या सुमारास प्रतापबिंब राजाने चाम्पानेरहून निघून पैठण येथे काही काळ वास्तव्य करून अपरान्त म्हणजे उत्तर कोकण जिंकण्याच्या उद्देशाने आपल्या भागावर स्वारी केली. तारापूर जिंकल्यानंतर तो महिकावती म्हणजे माहीम येथे येऊन त्याने ती राजधानी केली. या भागात येताना त्याने जी ६६ कुळे सोबत आणली त्यापैकी २७ कुळे सोमवंशीय होती. त्या कुळांपैकी काही कुळांचा समुदाय हाच सोमवंशी क्षत्रिय वाडवळ, पाचकळशी समाज!

उर्वरित वाचा

लोकनेते अण्णासाहेब वर्तक व महानायक पद्मश्री भाऊसाहेब वर्तक – लोकोत्तर पितापुत्र

ज्या महानुभावांनी आमच्या संघाची 104 वर्षांपूर्वी स्थापना केली व समाज उपयोगी संस्था उभारल्या,त्यामुळेच आज आपण जे काही आहोत ते झालेलो आहोत. या संस्था उभ्या राहिल्या नसत्या तर ही प्रगती  झाली नसती. आपण कितीही हुशार असलो कर्तुत्ववान असलो तरी ज्या नेत्यांनी व शैक्षणिक संस्था मुळे आपण शिकलो त्याची जाणीव ठेवून व्यक्तिगत व सामाजिक जीवनात त्यांचे योगदान आपण मानले पाहिजे असे मला तीव्रतेने वाटते. त्या दृष्टीनेच आमच्या अण्णासाहेब वर्तक व भाऊसाहेब वर्तक अशा लोकत्तर नेत्यांची चरित्रे आपण लक्षात घेतली पाहिजेत.

उर्वरित वाचा