कॅटेगरी: other

 ऑपरेशन सिंदूर

आमच्या  सनातन हिंदु संस्कृतीने कुंकवाची सांगड स्त्रीच्या सौभाग्याशी घातलेली आहे. कपाळावर अभिमानाने कुंकू धारण करणारी आमची विवाहिता हिंदू स्त्री स्वतःला ‘सौभाग्यवती’ म्हणविते. तिच्यासाठी  भालप्रदेशी असलेला तो लहान टिळा म्हणजे तिचे भाग्य  शालीनता,  संस्कृती स्वाभिमान आणि तिच्या स्वामित्वाची खूण!  स्त्रीच्या भाल प्रदेशावरील एका छोट्या तिलकातून  एवढी शक्ती सामर्थ्य व तेज प्रदान करणारा  सनातन हिंदू धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म सबंध जगात नाही!

उर्वरित वाचा

सामाजिक योगदानात, माझा खारीचा वाटा!

“दुर्लभं मानवे जन्मः..” असे म्हटले जाते. या मानवी जन्मात अनेक प्रकारच्या ऋणांची फेड करावयाची असते. त्यातील एक म्हणजे समाजॠण! ज्या समाजाने आपल्याला सामावून घेतले, मदत व मार्गदर्शन केले, ते ऋण अंशतः तरी फेडणे हे आपले कर्तव्य असते. तसे करताना मी काहीतरी विशेष केले अशी भावना नसावी. आमच्या सो क्ष समाजोन्नती संघाच्या स्थापनेला 100 वर्षे होऊन गेली आहेत. संघ स्थापनेपपासून ते आजच्या या ऊर्जेतावस्थेपर्यंत ज्या समाज बांधवांनी व धुळे नांदणी मोठे योगदान दिले, त्यांच्या कार्याचा आठव करतांना मी स्वतःला,विचारतो,   “मी समाजाला काय दिले? सर्वांकडून काही ना काही घेतच आलो पण अगदी निरपेक्षपणे मी काय दिले”.

उर्वरित वाचा

तस्मै श्री गुरुवे नमः – पुस्तक प्रकाशन सोहळा

माझ्या शिक्षण-कालखंडातील या गुरुजनांनी दिलेले ज्ञान व संस्कार घेताना माझ्या फाटक्या झोळीत जे जमले, ते मी भावी आयुष्यात मिरविले. आज इतक्या वर्षांनंतर त्या गतस्मृतींच्या सुवर्णक्षणांची आठवण करून ते कागदावर उतरविण्याचा केलेला हा प्रयत्न, ‘तस्मै श्री गुरुवे नमः ।’

उर्वरित वाचा

एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात..

पशुपक्ष्यांनाही प्रेम कृतज्ञता भीती या भावना असतात का हो? असतात! त्यांना भविष्याची चाहूल लागते का? स्वतःच्या आयुष्याचे अंदाज कळतात काय? कळतात! बोलता येत नसले तरी अंतर्मनात त्यांना कुठेतरी ह्या जाणीवा होतं

उर्वरित वाचा

व्ही जे टी आय्, माझी अध्यापन क्षेत्रातील मुशाफिरी!

आयुष्यात  कधीतरी ‘शिक्षकी’ करण्याचा माझा विचार होता. वडील एक हाडाचे शिक्षक असल्यामुळे ‘ती’ माझ्या रक्तातच होती! शाळेत व शाळा सुटल्यानंतरही अवतीभवती फिरणारे त्यांचे विद्यार्थी, त्या शिष्यांकडून त्यांना मिळणारा सन्मान, “गुरुजी

उर्वरित वाचा