आप्पांची पत्रे भाग-७

1969 ते 1974 या कालखंडातील ही पत्रे आहेत हा कालखंड आमच्या कुटुंबासाठी स्थितंतराचा आणि म्हणून महत्त्वाचा होता. या काळात आप्पांनी चिंचणी सोडली, व ते बोर्डीच्या जुन्या घरी मुक्कामाला आले. तो प्रसंग त्यांच्या पत्रांतूनच वाचायला हशवा. जगन दादा ,गजाभाऊ ,माझे सासरे वासुभाऊ,त्याचप्रमाणे शेजारी व मित्र निरोपासाठी जमले होते. अतिशय हृदयद्रावक प्रसंग !जवळजवळ एक तपाच्या कालखंडात आप्पा चिंचणीस होते. अरुणा चे लग्न,माझे लग्न ,बापू चा जन्म पपी चे चिंचणी हून , महाविद्यालयीन शिक्षणासाठी ,मुंबईस प्रयाण ,असे खूप महत्त्वाचे टप्पे या काळांत आहेत.गजाभाऊ सामानाचे ट्रक बरोबर चिंचणी हुन बोर्डी च्या घरी आले, एवढे त्यांचे आप्पा वर प्रेम होते . ती सर्व हकीकत वाचण्यासारखी .पुढे बोर्डी हून मुक्काम हलला ,घोलवडला.तेथेही विहीर खणण्याचे काम आप्पांच्या देखरेखीखाली सुरू झाले होते.
लहान हर्षु पहिल्यांदाच बोर्डीला, मे महिन्यात अरुणा बरोबर आली .बापू देखील पहिल्यांदा बोर्डीला आला ,ती सर्व हकीकत, लिहली आहे.याच सुमारास, ममा D.Ed, परीक्षा पास झाली ,त्याचा आनंदही,एका पत्रात वर्णिला आहे. अण्णांचे लग्न झाले व अण्णा ,पार्ल्याहून,गोरेगावच्या नवीन मुक्कामी स्थलांतरित झाले .पपीचे कॉलेज शिक्षण चालू असल्यामुळे ,तो पार्ल्यात आमच्याबरोबर होता. बापू व पपी काका यांची खूपच गमतीदार माहिती आहे,त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. लहान पपी त्यावेळी गोल्ड्सपोट च्या बाटली वरील बुचे गोळा छंद म्हणून गोळा करीत होता त्यासाठी मुंबईहून आम्ही ही अशी बुचे आणावीत अशी विनंती केलेली आहे .सगळ्या पत्रांत,आप्पांची आम्हा सर्व मुलांबद्दल व अरुणा, ममा बद्दल काळजी दिसून येते. खूपच महत्त्वाची पत्रे या संग्रहात आहेत. सर्वांनी मुळांत वाचावी. विशेष आनंददायक गोष्ट म्हणजे ,आपल्या वेबसाईटवर आलेल्या लेखांपैकी, वाचकांनी विशेष दखल, आप्पांच्या पत्रांची घेतलेली आहे. नंबर दोन वर ही पत्रे आहेत. आपणही याचा आनंद घ्यावा.