“पुण्यपीयूष पूर्णाः “…गोंडूमावशी!

        परवा 11 सप्टेंबरला रात्री साडेआठ वाजता माधुरीचा फोन आला. आता ‘काहीतरी वाईट बातमी ‘ तर ऐकावयास मिळणार नाही ना? अशी भीती मनात निर्माण होते न होते तोवर पहिलेच वाक्य

उर्वरित वाचा

कवी हृदयी, स्वानंदी, कै. दुगल सर

बोर्डी हायस्कूलमधील आमच्या शैक्षणिक कालखंडातील एक विद्यार्थीप्रिय तसेच प्रभावी शिक्षक म्हणजे न.दि.दुगल सर! त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वातून प्रथम दर्शनीच, त्यांच्या विद्वतेची छाप विद्यार्थ्यावर पडत असे. गोरेपान, उंचीने कमी असणारे दुगल सर आपल्या मराठी, इंग्रजी व संस्कृतच्या अफाट व्यासंगामुळे शिकवतांना विद्यार्थ्यांवर जबरदस्त छाप पाडीत. वर्गात शिरतानाच त्यांच्या चेहऱ्या वरील आत्मविश्वास व स्मितहास्य जणू दर्शवित असे ,
” मुलांनो आज मी जे काही शिकवणार आहे ते तुम्हाला अजून कोणी शिकवलेले नाही व शिकवणारही नाही!”

उर्वरित वाचा

मी सुद्धा अमेरिका पाहिली..

केल्याने देशाटन, जगात संचार होतो, पंडित मैत्री होते”… हे सर्व ठीक आहे! मात्र ते करण्यासाठी तुम्ही एक तर धनवान असायला हवे अथवा ज्या नोकरी व्यवसायात  असाल तेथे तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळावयास हवी. कालही हीच स्थिती होती आजही तीच आहे. नुसती परदेशगमनाची  स्वप्ने पाहण्यात  काय अर्थ आहे?

उर्वरित वाचा

निष्ठावंत, जगावेगळा संसारी शिक्षक, कै. स. वा. आपटे सर

शमोदमस्तमः शौचं क्षान्तिरार्जवमेवचl ज्ञानम् विज्ञानमास्तिक्यम् ब्रम्हकर्म स्वभावजम्ll शांतीप्रियता, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहिष्णुता, सत्यनिष्ठा, ज्ञानविज्ञानाप्रती आवड आणि धार्मिकता हे सारे गुण अंगी असणे म्हणजे खऱ्या अर्थाने ब्राह्मण्य आहे.    आजच्याच नव्हे तर कोणत्याही काळात

उर्वरित वाचा

‘एक विरक्त साधुपुरूष’, श्री.आर एम आरेकर सर

       राजा भर्तृहरीचे नीतिशतक, वैराग्यशतक आणि शृंगारशतक हा संस्कृत काव्यातील विविध विचार प्रवाहाचा एक त्रिवेणी संगम आहे. हे व्यवहारनिती सांगणारे एक प्रभावी मुक्त काव्य आहे. त्यातील एक श्लोक फारच बोलका आणि

उर्वरित वाचा

एक होते घर… ते होते माझे घर!

    “हे विश्वचि माझे घर” असे ज्ञानदेव म्हणून गेले. ज्ञानेश्वर एक जीवनमुक्त संत व ज्ञानी पुरुष होते. त्यांच्यासाठी संपूर्ण विश्व हेच त्यांचे घर. माझ्यासाठी व माझ्यासारख्या अनेक सामान्य माणसांसाठी ‘विश्व’ हे

उर्वरित वाचा

स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक, गुरुवर्य कै. ग. रा. अमृते उर्फ आप्पा

 आमच्या बोर्डी घोलवड  परिसरातील ही भूमी एखाद्या सुंदर फुलबागेसारखी आहे. बागेत वेगवेगळ्या आकाराची, रंगाची, गंधाची फुले असतात. त्या फुलझाडांचे बीज वेगवेगळे असते. पण ती एकाच मातीत रुजतात. त्या बीजाची गुणसूत्रे

उर्वरित वाचा

सकारात्मक विचारांचा ऊत्स्फूर्त प्रवाह, श्री. दिपक जगन्नाथ ठाकूर

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् । अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः|| श्रीमद्‍भगवद्‍गीता    स्थिरचित्त, समाधानी, आत्मसंतोषी, आपल्यापाशी जे आहे ते विद्या वा वित्त, समाजासाठी देण्यास तत्पर असलेला व एवढे करूनही आनंदात व दुःखात

उर्वरित वाचा

“निरोप कसला माझा घेता?” श्रीमती कल्पलता प्रमोद चुरी

 परवा, दिनांक 3 मार्च शुक्रवार रोजी विलास बंधूंचा फोन सकाळी खणखणला. नेहमीच्या खर्जातील आवाजााऐवजी सौम्य आवाजातील “दिगंबरजी” हा पहिलाच शब्द ज्या गंभीरतेने त्यांनी उच्चारला तो ऐकून मी थोडा धास्तावलो…पुढे त्यांनी

उर्वरित वाचा

चतुरस्त्र, बहू-आयामी आचार्य, कै.दामोदर ह. सावे सर

अतुल्या कल्याणी प्रकृतिरनघं वल्गु च वचो, मनीषा निर्दोषा महितमविगीतं च चरितम् । अदूष्यं वैदुष्यं हृदयमपि येषामुरुदयं, ध्रुवं तेषामेषामिह परिचिचीषापि शुभदा ॥        “ज्यांचा स्वभाव कल्याणकारी, ज्यांचे बोलणे खरे आणि गोड, विचारसरणी

उर्वरित वाचा